दत्त माझा मी दत्ताचा

 

|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||    
 
 जेंव्हा आपण सद्भगुरूंच्या सनिध्यात येतो तेंव्हा सद्गुरू काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणी मग जवळ करतात. सोनं जस भट्टीमध्ये टाकल आणी त्याची गाळणी केली कि गाळ निघून जातो आणी शुद्ध सोन तेवढ राहत व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो, तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रुपी गाळ बाजूला काढतात आणी मग जो सात्विक असा राहतो, त्याला सद्गुरू भक्त म्हणून स्वीकारतात।
 
म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुख आली तरी कधीच त्याना सोडव असा म्हणू नका, फक्त हात जोडा आणी हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतक सांगा. ते भक्त वत्सल आहेत, सोडव म्हणालात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केंव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढ नक्की. भोग हे कर्क रोगाच्या गाठी प्रमाणे आहेत, डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही, तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली कि पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही, तसे कर्म पूर्ण भोगून झाले कि पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही।जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती,श्रद्धा,अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडुन तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परम कृपाळू गुरूवरांच्या चरणी मागावे.
 
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

Comments

Popular posts from this blog

श्री नारद पुराणातील नारदांनी रचलेले संपूर्ण दत्तात्रेय स्तोत्र

दत्त नाम का घेतो?