दत्त नाम का घेतो?
- Get link
- X
- Other Apps
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
दत्त नाम का घेतो ..?
मुळात आपण अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे का म्हणतो?
तर आपण जेव्हा संकटा मधे असतो आणि इतर सर्व मार्ग बंद होतात तेव्हाआपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करतो.
आता दत्त महाराजांचेच स्मरण का? तर दत्त महाराज स्मर्तृगामी आहे.
स्मर्तृगामी म्हणजे काय?
स्मरण करताच तत्काळ आपल्या मदती साठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी.जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही.आणि म्हणून दत्त महाराज हे लवकर पावणारे दैवत आहे.
काही जण विचारतील की आम्हीकुणाची सेवा करु?तर याचे उत्तर खुप सोप्पे आहे.ज्या देवतेचे स्मरण करताच तुम्हाला शहारे आले. डोळ्यात अश्रु आले.तुमच्या अपूर्णतेला एक प्रकारची पुर्णत्वचि जाणीव झाली तर समजून घ्या की त्या देवताची आराधना तुम्ही करावी.
दत्त महाराज आणि स्वामी महाराज एकच आहेत.श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत मधे याचा उल्लेख आहेच.पण आताच्या काळात् सुद्धा त्याची प्रचिती पदोपदी येते. आपल्या सारख्या सामान्य सेवेकऱ्याला ह्या महावाक्याचा अर्थ कळणार नाही. पण ज्या प्रमाणे भगवान परशुराम आणि प्रभु श्री रामचन्द्र हे भगवान विष्णु यांचा अवतार असून सुद्धा त्यांचे कार्य क्षेत्र वेगळे होते पद्धत वेगळी होती. ज्या प्रमाणे ताक दही लोणी तूप हे दूधापासून तयार होतात त्या प्रमाणेदत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहे.
आपण जेव्हा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणतो आपण तेव्हा दत्त महाराजांचे स्मरण करतो चिंतन करतो आणि जेव्हा आपन दत्त प्रभूंचे चिंतन करतो तेव्हा कुठलीच चिंता आपल्याला भेड़सावत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने सर्व देवी देवतांच्या सेवेचे फळ मिळते. पावसाचे पाणी सर्व नद्यांद्वारे हे समुद्रात जाऊन् मिळते त्या प्रमाणे सर्व देवी देवतांची केलेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू होते. पितृ दोष असेल, कुंडली मधे दोष असेल, वास्तू दोष असेल, जगातली कुठलीही समस्या महाराजांच्या सेवेने दूर होते. एवढेच नाही तर प्रपंच्या मधल्या अडचणी दूर करण्यासाठी आत्मिक प्रगति साठी दिवसातून एकदा तरी अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंतःकरण पूर्वक म्हणावे. !!
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment